नांदेड : महाराष्ट्राची परंपरा असलेली टाळकरी दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, बँड पथक आदींसह ‘नफरत छोडो, भारत जोडो’ च्या घोषणांनी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) पदयात्रेत उत्साह आणला. कापसी गुंफा (ता. लोहा) येथून गुरुवारी (ता.१०) चौथा दिवशी उत्साहात पदयात्रा सुरू झाली. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह नेते, कार्यकर्ते, महिलांसह शेतकरी, कष्टकऱ्यांनी पदयात्रेत सहभागी होत हा दिवस गाजवला.
कापसी गुंफा येथे लोहा-कंधारमधील हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. राहुल गांधी गुरुवारी सकाळी सहा वाजता येताच घोषणांनी परिसर दणाणला. कडाक्याच्या थंडीतही कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली.
पदयात्रा मारतळा, काकांडी, जवाहरनगर, तुप्पा पाटी आदी ठिकाणांवरून मार्गस्थ झाली. ज्येष्ठ नेते एच. के. पाटील, योगेंद्र यादव, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल, प्रांताध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, श्री जया व सुजया चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे आदी उपस्थित होते.
शेतीप्रश्नी येसगेंचा गांधींशी संवाद
शेतकरी, शेतमजूरप्रश्नी सामाजिक कार्यकर्ते कैलास येसगे यांनी वझरगा ते शंकरनगर येथील पदयात्रे दरम्यान गांधी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीकविमा कंपनीकडून होणारी शेतकऱ्यांची लूट, शेतीमालाला योग्य दर, बेरोजगारांच्या हाताला काम देणे आदी प्रश्नांवर त्यांनी गांधी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर गांधी यांनी भोपाळा येथे झालेल्या सभेत पीकविमा कंपनीचा घोटाळा, केंद्र सरकारचे याबाबतचे धोरण यावर घणाघाती टीका केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2023

Article Tags:
news